Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प ,वाहनांच्या रांगा
चिपळूण – मुंबई – गोवा मार्गावर चिपळूणजवळ आज सकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे बोलले जात होते.
खरे तर आठवड्याच्या शेवटी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते.अनेकजण आपली खासगी वाहने घेऊन प्रवास करत असतात.त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन अशी वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान, काल याच मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दरड कोसळल्याने अशीच वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांनी रस्त्यावर उतरून ही कोसळलेली दरड बाजूला केली होती.





