नीटसारख्या राष्ट्रीय परीक्षा रद्द करा! मुख्यमंत्री स्टालिन यांचे मोदींना पत्र
![Cancel national exams like Neat! Chief Minister Stalin's letter to Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/MK-STALIN-scaled.jpg)
चेन्नई- विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने १२ वीची परीक्षा रद्द केली आहे. त्याच धर्तीवर शैक्षणिक प्रवेशासाठीच्या नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
देशातील कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन सीबीएसईने १२ वीची परीक्षा रद्द केली. ४ जून रोजी काढलेल्या पत्रकानुसार विद्यार्थ्यांना सीबीएसई वैकल्पिक मापदंडानुसार गुण देऊन त्यांचा निकाल जाहीर करणार आहे. तेव्हा इंजीनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या नीट आणि जेईईसारख्या परीक्षा रद्द कराव्या, अशी मागणी स्टालिन यांनी शनिवारी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.