जालन्यात म्युकरमायकोसिसचे ५७ रुग्ण
![57 patients with myocardial infarction](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Mucomicosis-e1620721883673-1.jpg)
जालना |
जालना जिल्ह्य़ातील म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या ५७ झाली असून त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवापर्यंत जिल्ह्य़ात १८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ात चार लाख ३६ हजारांपेक्षा अधिक करोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ६० हजार ३१५ नमुने करोनाबाधित निघाले. एकूण चाचण्यांमधील करोनाबाधितांचे प्रमाण १३.१२ टक्के आहे. आरटीपीसीआर चाचण्यांतील करोनाबाधितांचे प्रमाण ४.७९ टक्के आहे. बुधवारी जिल्ह्य़ात एकूण पाच हजार ३५० करोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये १०७ म्हणजे दोन टक्के नमुने करोनाबाधित निघाले.
जिल्ह्य़ात आतापर्यंत ५८ हजार ५३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६.२८ टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत एक हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६७८ मृत्यू शासकीय रुग्णालयांतील तर ३३४ मृत्यू खासगी रुग्णालयातील आहेत. सध्या जिल्ह्य़ात ६१८ व्यक्ती गृहविलगीकरणात असून ११२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत एक लाख २६ हजार व्यक्तींनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. यामध्ये ६२ हजारांपेक्षा अधिक गृहविलगीकरणाचा तर जवळपास ६४ हजार व्यक्तींनी संस्थात्मक अलगीकरणातील कालावधी पूर्ण केला आहे.