फिफा विश्वचषक : नायजेरियावर मात करून अर्जेंटिना बाद फेरीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Nigeria-.jpg)
सेंट पिटर्सबर्ग – फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात नायजेरियाचा 2-1 ने पराभव केला. या विजयाने अर्जेंटिना अंतिम 16मध्ये पोहोचला आहे. आईसलॅंडसोबतचा पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तर दुसऱ्या सामन्यात क्रोएशियाकडून 3-0 अशी हार पत्करावी लागली होती. यामुळे बादफेरीत पोहोचण्याचा प्रवास कठीण झाला होतो. मात्र, अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात विजय मिळवून अर्जेंटिनाने बाद फेरीत प्रवेश केला आहे.
मार्कोस रोजो याने 86 व्या मिनिटाला केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने विजय मिळवला. या सामन्यात अर्जेंटिनाला विजय तर हवा होताच. शिवाय दुसऱ्या गटातील क्रोएशियाने आईसलॅंडला हरवणे गरजेचे होते. तरच अर्जेंटिना बाद फेरीत पोहोचणार होता. शेवटी सर्व अर्जेंटिनाच्या पक्षात गेले. त्यांनी नायजेरियाला हरविले. तर क्रोएशियाने आईसलॅंडवर 2 -1ने विजय मिळवला.
अर्जेंटिनाने सामन्याची सुरुवात सकारात्मक केली. मेसीने 14 व्या मिनिटाला गोल करत आपल्या चाहत्यांना अधिक वाट पाहण्याची संधी दिली नाही. विशेष म्हणजे मेसीचा हा गोल या विश्वचषकातील 100वा गोल होता.