Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#covid19havoc: या दहा केंद्रांवर नागरिकांची दररोज होणार ‘रॅपीड अॅण्टीजन टेस्ट’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/pcmc-11.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांची कोविड-१९ ची तपासणी (Rapid Antigen Tests) तपासणी करण्यासाठी नमुने तपासण्याची सुविधा महापालिकेच्या खालील केंद्रावर करण्यात आली आहे. याठिकाणी दररोज कोविड 19 ची तपासणी केली जाणार आहे. जर कोणाला त्रास सुरू झाल्यास त्यांनी खालील केंद्रांवर संपर्क साधून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
अ.क्र. | तपासणी केंद्राचे नांव व पत्ता | Rapid Antigen Tests तपासणी वेळ |
१ | आर.टी.टी.सी सेंटर, बी.एस.एन.एल ऑॅफिस, संभाजीनगर | सकाळी – ९.०० ते रात्री- ९.०० |
२ | तालेरा रुग्णालय, तानाजीनगर चिंचवड गांव | सकाळी- ९.३० ते सायं- ५.०० |
३ | यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर पिंपरी-१७ | सकाळी – ८.०० ते रात्री- ८.०० |
४ | बालभवन, खराळवाडी दवाखाना शेजारी, खराळवाडी | सकाळी- ९.०० ते दुपारी- ३.३० |
५ | जुने जिजामाता रुग्णालय, कमला नेहरु मराठी शाळेजवळ, पिंपरी | सकाळी – ८.०० ते रात्री- ८.०० |
६ | भोसरी रुग्णालय, पी.सी.एम.टी. चौक, भोसरी | सकाळी- ९.०० ते दुपारी- ३.०० |
७ | यमुनानगर रुग्णालय, निगडी | सकाळी – ८.०० ते रात्री- ८.०० |
८ | म्हेत्रेवस्ती दवाखाना, म्हेत्रेवस्ती पोलीस चौकी जवळ | सकाळी – ९.०० ते दुपारी- १.०० |
९ | खिंवसरा पाटील, थेरगांव रुग्णालय, म.न.पा.जलतरण तलाव जवळ, थेरगांव | सकाळी – ९.०० ते दुपारी- ४.०० |
१० | बॅटमिंटन हॉल, जलतरण तलावा जवळ, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव. | सकाळी- ९.३० ते सायं- ४.०० |
कोविड-१९ तपासणी केंद्रावर निश्चित केलेल्या वेळेमध्ये Rapid Antigen Tests ची सुविधा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी दररोज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.