breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आमदार सुवेंदू अधिकारींचे वडील व भाजपा खासदार सिसिर अधिकारी यांना केंद्राकडून Y+ सुरक्षा

बंगाल |

बंगालचे भाजपा खासदार आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे वडील सिसिर अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार दिव्येंदू अधिकारी यांनाही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या दोघांच्याही सुरक्षेसाठी आता सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं आहे. अधिकारी परिवार पूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते. सुवेंदू यांनी ज्यावेळी पक्ष बदलला आणि भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी सिसिर अधिकारी यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्येही ते सामील झाले होते.नोव्हेंबरच्या अखेरीस तृणमूल काँग्रेसची चिंता वाढवणारी राजकीय घटना घडली. राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले आणि पक्षातील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ‘ममता दीदीं’ना हादरा दिला.

परिवहन, जलसिंचन, जलस्त्रोत व विकास ही महत्त्वाची तीन खाती तसेच हलदिया विकास प्राधिकरणचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. त्यानंतर अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही त्यांनी ममतांकडे सुपूर्द केला. तब्बल १८ विधानसभा मतदारसंघांवर अधिकारी घराण्याचा प्रभाव टिकवून असल्याने सुवेंदू हे तृणमूलसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्नही ममता बॅनर्जी यांनी करून पाहिला.ब्रिटिश राजवटीविरोधात लढलेल्या सरकार कुटुंबात जन्मलेले सुवेंदू हे स्वतंत्र बाणा राखणारे नेते म्हणून पश्चिम बंगालच्या राजकारणात परिचित आहेत. सुवेंदू अधिकारी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले.१९८९ मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी छात्र परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. २००६ मध्ये ते ‘कांता दक्षिण’मधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग दोनदा तमलूक मतदारसंघाचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button