कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/images-8.jpeg)
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल तिने ट्वीट करत आक्षेपार्ह भाष्य केले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात तृणमूल काँग्रेस विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना राणावतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर कंगना अनेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ दिसली. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगनाने टीएमसीला लक्ष्य केले आहे. कंगनाने नुकतेच एक धक्कादायक ट्विट देखील केले होते. त्यात तिने लिहिले होते, ‘मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावादक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारा राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.’