‘तो खर्च महिन्याच्या ‘कलेक्शन’मधून करा’, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
![‘Make that expenditure from the monthly‘ collection ’’, MNS told the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Untitled-design-1.png)
मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हप्ते वसुलीचा आरोप केल्यानंतर विरोधकांकडून ठाकरे सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. मनसेकडून देखील या सर्व प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यातच आता छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील प्रकाशव्यवस्थेवरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
वाचा :-‘काँग्रेसचा चप्पल उचल्या सचिन सावंत’, निलेश राणेंची बोचरी टीका
छत्रपती शिवाजी महाराज पार्कला विद्युत रोषणाई करण्याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू नये, यासाठी घाट घातला जात आहे. खरोखरच करायचं असेल, तर जनतेच्या पैशातून का? महिन्याला येण्याऱ्या ‘कलेक्शन’मधून करा, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
https://www.facebook.com/sandeepDadarMNS/posts/3773843696004526
संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये अतिरिक्त विद्युत दिवे आणि इतर सुशोभिकरण करण्यासाठी माझ्या आमदार निधीतून सव्वा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा, असे मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे.
मुख्यमंत्र्यांचे हे पत्र शेअर करत देशपांडे म्हणाले की, दरवर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा, म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय मनसेला मिळू नये, म्हणून जनतेच्या पैशातून वर्षभर रोषणाई करण्याचा घाट घातला जात आहे. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होते का? आणि खरोखरच करायचं आहे, तर जनतेच्या पैशातून का ? महिन्याला येण्याऱ्या “collection” मधून करा. असो शुभेच्छा, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.