Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
जयंत पाटील यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण
![Along with Jayant Patil, his son also contracted corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Jayant-Patil-Son-Pratik-Patil-.jpg)
सांगली – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे थोरले सुपुत्र प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ प्रतीक पाटील यांनाही कोरोना झाला आहे.
“नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी, अशी माहिती प्रतीक पाटील यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा,” असे आवाहनही प्रतीक पाटील यांनी केले आहे.