पिंपळे गुरवमध्ये १६ नायजेरीयन तरुणींना अटक
![Exposed prostitution under the name of Spa Center at Hinjewadi IT Park](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Sex-rackeT-Frame-copy-2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क या भागात वेश्याव्यवसाय करणा-या १६ नायजेरीयन तरुणींना सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री सामाजिक सुरक्षा पथकाकडून बनावट ग्राहकाद्वारे या रॅकेटवर सापळा रचून कारवाई करण्यात आली असल्याचे सामाजिक सुरक्षा पथकाकडून सांगण्यात आले. पिंपळे गुरव येथे हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात मसाज पार्लरची मोठी संख्या आहे. पिंपळे गुरव रहिवाशी भागात सापळा रचून सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. यात चार तरुणी ग्राहकांना पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली. यातील काही तरुणी कोंढवा परिसरातून येवून येथे व्यवसाय करत होत्या. ऑनलाईन ग्राहक शोधून हा व्यवसाय सुरू होता. अशी माहिती पथकाकडून देण्यात आली.
सामाजिक सुरक्षा विभागाने त्याठिकाणची संख्या पाहता सांगवी पोलिसांना सोबत घेवून मोरया पार्क भागात छापा टाकून कारवाई केली. रात्री उशीरापर्यंत सांगवी पोलिस ठाण्यात कारवाईचे काम सुरू होते. यात या नायजेरियन तरुणींचे पासपोर्ट तपासणी, त्यांची इतर राहण्याची ठिकाणे चौकशी करून तपासणी करण्यात येत होती. सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे व पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे पुन्हा भाडेकरार नसणे, पोलिस ठाण्यात भाडेकरुंची नोंद नसणे, ज्यादा रक्कम भाड्यापोटी मिळत असल्याने विना चौकशी विदेशी नागरीकांना घरे मिळणे ही गंभीर बाब समोर येत आहे. तर घरमालक एजंट लोकांवर प्रॉपर्टी मोकळी सोडून ईतरत्र राहातात. या कामात भाडेकरी मिळवून देण्यासाठी एजंट लोकांचाही आर्थिक फायदा होत असल्याने विदेशी नागरीकांना भाड्याची घरे मिळवून देण्यासाठी ही एजंट मंडळी सक्रीय असतात. पिंपळे गुरव येथे वेश्याव्यवसाय करणा-या १६ तरुणींना सापळा रचून सामाजिक सुरक्षा पथकाकडून अटक करण्यात आली.