…आता नागरिकांना येरवडा जेल पाहता येणार
![... Now citizens can see Yerawada Jail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/YERVDA-JAIL.jpg)
– 26 जानेवारीपासून पुण्यातील येरवडा कारागृहात ‘जेल पर्यटन’ सुरु करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा
पुणे । प्रतिनिधी
येत्या शनिवारी (दि. 26) पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी १२ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे विद्यार्थी, सवर्सामान्य नागरिक आणि इतिहास संशोधक यांना येरवडा जेल पाहता येणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगाचे खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत.
येरवडा जेल येथे स्वातंत्र्य सैनिक होतेच. अजमल कसाब याला फाशी देण्यात आली होती. चाफेकर बंधूंची या ठिकाणी केस सुरु होती. त्यांना देखील या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. असे हे ऐतिहासिक घटना घडलेले जेल आहे. त्याला विद्यार्थी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. ५०० एकर मध्ये हे जेल पसरलेले आहे. १५० वर्षांपूर्वी हे तयार करण्यात आले आहे. स्वातंत्र्य सैनिकांना जिथे ठेवले होते तोच भाग सुरु करणार आहे. कोव्हिडच्या पार्शवभूमीवर दक्षता घेण्यात आली आहे.
हे पाहता येणार…
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला पुणे करार, महात्मा गांधी, पंडित नेहरूंना बंधिस्त करण्यात आलेले ठिकाण. स्वातंत्र्य सैनिकांना बंधिस्त केलेले ठिकाण त्याचा अभ्यास करता येणार आहे.