राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर…; प्रकाश आंबेडकरांची टीका
![Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar criticises NCP over Dhananjay Munde rape allegations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/sharad-pawar-prakash-aambedkar.jpg)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही धनंजय मुंडेंच्या बलात्काराच्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी मुफ्ती, मौलाना यांची भेट घेतली, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंडे यांच्या राजीनामा हा कोर्टाचा विषय आहे, लोक निवडणूक आयोगाकडे का जातात?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवं.
राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. 27 जानेवारीला संपूर्ण राज्यात वंचितच्या बॅनरखाली प्रत्येक जिल्ह्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे आंदोलन होणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केलंय.