Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी ‘मनसे’ सज्ज

राज्यातील विविध निवडणुकींसाठी अनेक पक्षांची तयारी सुरू झाली आहे. यातच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आता राज ठाकरेंचा हा पक्ष ‘मनसे’ सज्ज होत आहे.

तरुण मतरादारांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणाच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. अमित ठाकरे यांचा आश्वासक चेहरा आणि त्यांची कामगिरी या साऱ्याचा पक्षाच्या वाटचालीत मोलाचा हातभार लागणार आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचं उदघाटन रविवारी करण्यात आलं. यावेळी पक्ष आगामी पालिका निडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. पाटील यांनीह ही बाब स्पष्ट करताच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

पण राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यामुळे मनसे सैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button