स्पाईन रोड बाधितांचे स्वप्न अखेर साकार; लाभार्थींच्या प्लॉटचे भूमिपूजन!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची स्वप्नपूर्ती
प्लॉट्सवरील पायाभूत सुविधांसह रेखांकनाच्या कामालाही सुरुवात
पिंपरी । प्रतिनिधी
स्पाईन रोडबाधीत कुटुंबियांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या प्लॉटचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. संबंधित प्लॉटवरील वीज, सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत रस्ते अशा कामाला गती देण्यात आली असून, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने प्लॉटचे गुरुवारी भूमिपूजन करण्यात आहे.
भूमिपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका सीमा सावळे, नम्रता लोंढे, ‘बीआरटी’ विभागाचे श्री. सवणे साहेब, निलेश भालेकर यांच्यासह स्पाईन रोड बाधीत नागरिक उपस्थित होते.
२०१४ पूर्वी स्पाईन रोड मधील बाधित लोकांना ५०० स्क्वेअर फुट, ७५० स्क्वेअर फुट, १००० स्क्वेअर फूट अशा पद्धतीने बाधित कुटुंबियांना जागा मिळणार होती. मात्र, आमदार लांडगे यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून बाधीत नागरिकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी प्राधिकरणाचे अधिकारी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले. ५००, ७५० आणि १००० स्क्वेअर फूट जागेत प्रत्येकाला स्वतंत्र घर कसे बांधता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बाधीत नागरिकांना किमान १ हजार २५० स्क्वेअर फूट जागा मिळावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केली होती. यासाठी राज्य शासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला.शासनाच्या मंजुरीनंतर या जागेवर रस्ता, लाईट, ड्रेनेज, आणि पाणी याची व्यवस्था करण्याकरिता महापालिकेकडून देखील तरतूद मंजूर करून घेतली.
जागेचा ताबा मिळण्याचा मार्गही मोकळा…
बाधित नागरिकांनी संबंधित जागा ‘लीज डिड’ करून प्राधिकरणाकडून त्यांच्या नावे करण्याकरिता बैठक आयोजित केली. त्यामध्ये महापालिका आयुक्तांनी २२ जानेवारीपर्यत १३२ लोकांचे लोकांचे ‘लीज डिड’ करून देतो, असे आश्वसन दिले. त्यामुळे आता नागरिकांना त्या जागेचा ताबा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
८ वर्षांनी मिळाला योग्य न्याय …
त्रिवेणी नगर येथील ७५ मीटर रुंद स्पाईन रस्त्याने १३२ मिळकती बाधित होत आहेत. यापैकी १७ मिळकती १३ जानेवारी २०१३ रोजी पाडण्यात आल्या होत्या. या लोकांची घरे पाडून आठ वर्षे पूर्ण झाली. मात्र, त्यांना न्याय मिळाला न्हवता. आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केल्याने नागरिकांना चांगला मोबदला मिळाला असल्याची प्रतिक्रिया बाधित नागरिक व्यक्त करत आहे.