breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीपाद छिंदमला कोर्टाचा दणका; सरकारने घेतलेला निर्णय कायम
औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्दच ठेवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ठाकरे सरकारच्या निर्णयाला छिंदमने हायकोर्टात आव्हान दिले होते. परंतु सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने छिंदमला दणका दिला.
वाचा :-शहराचं नाव बदलून वातावरण बिघडवू नका; बाळासाहेब थोरातांची विनंती
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्यामुळे अहमदनगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले होते. शासन निर्णयाच्या विरोधात छिंदमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयानेही श्रीपाद छिंदमला झटका दिला.