Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अवैधरित्या दारू विक्री करणा-या 13 जणांवर कारवाई

दिघी, चाकण, देहूरोड, चिंचवड, निगडी, चिखली आणि पिंपरी परिसरात 13 ठिकाणी पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणा-या 13 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 59 हजार 823 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

दिघी पोलिसांनी भारत माता नगर येथे एक हजार 924 रुपयांची दारू, चाकण पोलिसांनी 3 हजार 244 रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली. देहूरोड पोलिसांनी हौसा टीट्या सिंग (वय 48, रा. गांधीनगर, देहूरोड) हिच्यावर कारवाई करत तिच्याकडून एक हजार 400 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. चिंचवड पोलिसांनी एक हजार 400 रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली तर निगडी पोलिसांनी 35 हजार 15 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. चिखली पोलिसांनी एक हजार 536 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. पिंपरी पोलिसांनी एक हजार रुपयांची 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button