मोरवाडी येथील अपंग भवनाचे काम प्रगतीपथावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pcmc-16.jpg)
- समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केली पाहणी
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील मोरवाडी येथे भव्य अपंग भवन उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील अपंग नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधांची माहिती मिळावी, त्यांच्या समस्या, शासनाकडून मिळणा-या योजनांच्या लाभाची माहिती अपंग भवनात मिळू शकणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे भव्य वास्तू उभारण्यात येत आहे. त्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून काही महिन्यांतच अपंग भवन सुरू होणार आहे.
या भव्य वास्तुची पाहणी करण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी आज सकाळी पाहणी केली. प्रत्यक्ष चालू कामाचा आढावा घेऊन तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी त्याठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांना दिल्या.