Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भारतमाता सहकारी गृहनिर्माण संस्थेला एसआरए अंतर्गत प्रमाणपत्र
![Certificate under SRA to Bharatmata Cooperative Housing Society](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/बनसोडे.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील झोपडीधारकांची एसआरए अंतर्गत शहरातील पहिल्या सोसायटीला प्रमाणपत्र दिले आहे. खराळवाडी, पिंपरी येथील भारतमाता सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीला शहरात पहिले प्रमाणपञ देण्यात आले आहे. आमदार आण्णा बनसोडे व मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी नगरसेवक राहुल भोसले, आर. के. डेव्हलपर्सचे राजेश कदम, एसआरए प्रकल्प सल्लागार अनिल जगताप व सोसायटीचे सभासद गणेश धोञे आणि आनंद देवकर आदी या वेळी उपस्थित होते.