राज्यात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम राहणार
![Chief Minister Uddhav Thackeray will visit Bhandara today and inspect the hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/cm-maha_0.png)
मुंबई – देशात जरी कोरोना रुग्ण आढळत असले तरी महाराष्ट्रात काहीशी दिलासादायक स्थिती आहे. नात्र, जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनला सुरुवात झाल्याने आणखी खबरदारी पाळण्यात येत आहे. याच अनुषंगाने ठाकरे सरकारने राज्यात ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं जाहीर केलं आहे.राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे. तसेच, उद्या (३१ डिसेंबरला) ११ नंतर हॉटेल, बार बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
वाचा :-“आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा”; राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचले
राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार करोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगितलं आहे. तसंच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे. तसंच याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असं स्पष्ट केलं आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत.