Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पूर्णानगरमध्ये आरोग्य सेवा सप्ताहाचा प्रारंभ, महागड्या तपासण्यांचा मोफत लाभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201222-WA0008.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
सामाजिक कार्यकर्ते राहूल चौधरी आणि पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांच्या वतीने मोफत आरोग्य सेवा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 22) झाला असून यामध्ये गरजू रुग्णांवर विविध उपचार मोफत केले जात आहेत.
या आरोग्य सेवा सप्ताहामध्ये मधुमेह, मधुमेहामुळे पाय दुखणे, रक्तदाब, संधीवात, स्वेतींग सापटिका, कंबरदुखी, निद्रानाश, चक्कर येणे, पार्किन्सन आदी तपासण्या केल्या जात आहेत. यातील फुट पल्स थेरपी उपचार हे वैशिष्ट्यपूर्ण तपासणी मानली जात आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना फायदा होत आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपचार सप्ताहाचा फायदा घ्यावा, असे आवाहन चौधरी आणि गर्ग यांनी केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201222-WA0010.jpg)