breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवनगर प्राधिकरणाचे सीईओ बन्सी गवळी यांची बदली

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांची साडेपाच महिन्यांतच बदली झाली आहे. त्यांची अकोला जातपडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गवळी हे 1 जुलै 2020 रोजी प्राधिकरणामध्ये “सीईओ’ म्हणून रूजू झाले होते. साडेपाच महिन्यांमध्येच त्यांची बदली करण्यात आली आहे. गवळी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. माझी अकोला जातपडताळणी समितीच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती केली आहे, असे त्यांनी नमूद केले. पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्प आणि मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रातील खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button