राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,52,266 वर
![Worrying! 49,447 in the state and 9090 in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow.jpg)
- मुंबईत 786, पुण्यात 685 नवे रुग्ण
मुंबई – रविवारी दिवसभरात आढळलेल्या 4,757 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,52,266 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 7,486 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 40 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,23,370 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 47,734 वर पोहोचला आहे. तर सध्या 80,079 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाचा:-भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 96,77,203 वर
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 786 नवे रुग्ण आढळले, तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,86,053 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,896 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 2,60,285 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 14,051 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 685 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,47,815 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,492 इतका झाला आहे. तसेच काल 664 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,28,488 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 685 रुग्णांमध्ये 309 रुग्ण हे पुणे शहरातील असून 123 रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि 253 रुग्ण ग्रामीण भागातील व कंटेनमेंट झोनमधील आहेत.