Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा : २६ तारखेच्या संपात सहभागी व्हाल, तर शिस्तभंगाची कारवाई !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/EnrHwQGUUAYYLJd.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांकडून २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. मात्र, या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शासनाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने कळवली आहे.