Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
पुण्यात कोरोना साथीशी लढणा-या आरोग्य विभागाचे तीन अधिकारी बाधित

पुणे |महाईन्यूज|
पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. पुण्यात 13 ते 23 जुलै 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला तरी देखील कोरोना आटोक्यात आला नाही. मात्र, कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे. तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत.
पुणे महापालिकेत आतापर्यंत 313 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, महापौरांसह 168 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 132 कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांची मृत्यू झाला आहे.





