पिंपरी चिंचवडमध्ये आज दीडशे रुग्ण पाॅझिटिव्ह
![# Covid-19: Double mutation in more than five hundred specimens in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे आज (मंगळवारी) 151 नवीन रुग्णांची पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आजपर्यंतची 88 हजार 986 एवढी रुग्णसंख्या झाली आहे. दिवसभरात 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील चार व हद्दीबाहेरील दोन एकूण सहा जणांचा आज मृत्यू झाला. यामध्ये चिंचवड येथील 75 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 41 वर्षीय पुरुष, निगडी 64 वर्षीय पुरुष, भोसरीतील 66 वर्षीय पुरुष आणि महापालिका हद्दीबाहेरील परंतु पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना देहूगाव येथील 54 वर्षीय पुरुष, शिरूर येथील 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
शहरात आजपर्यंत 88 हजार 986 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 86 हजार 35 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1551 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 641 अशा 2192 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 732 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 689 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.