सागाव ग्राम विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना ९% डिव्हिडंट वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201110-WA0000.jpg)
शिराळा |प्रतिनिधी
सागाव (ता.शिराळा) येथील सागाव ग्राम विकास सेवा सोसायटीच्या वतीने सभासदांना चालू वर्षी ९ टक्के दराने डिव्हिडंट वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शशिकांत पाटील यांनी दिली.
सागाव ग्राम विकास सेवा सोसायटीला चालू वर्षी १०२ वर्षी पूर्ण झाली आहेत.गेल्या ५० वर्षांपासून सागाव ग्राम विकास सेवा सोसायटीने प्रतिवर्षी सभासदांना डिव्हिडंट वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे. चालू वर्षी अवकाळी पावसाने,तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावाने येथील सर्वसामान्य शेतकरी वर्ग आर्थिक परिस्थितीने मेटाकुटीला आला असताना,सागाव ग्राम विकास सेवा सोसायटीने ९ टक्के एवढा डिव्हिडंट वाटप करून,सर्वसामान्य शेतकऱ्यांना दीपावली सणात दिलासा दिला आहे.तसेच ५००० रु.शेअर्स रक्कम पूर्ण झालेल्या सभासदांना आकर्षक हाॕटस्पाॕट,तेल व मोती साबण दीपावलीनिमित भेट देण्यात आला आहे.
तसेच सागाव ग्रामविकास सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने यापुढेही सभासदांचे हित लक्षात घेऊन आणखी काही सुविधा देता येतील का ? याबाबत विचारविनिमय चालू असल्याचे यावेळी संस्थेचे चेअरमन शशिकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी शिराळा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अॕड.रवी पाटील, से.सो. चेअरमन मा.शशिकांत पाटील,सम्राट शिंदे, भाजप युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी,विष्णू पवार,पंडित पाटील,सेक्रेटरी भगवान पाटील,जेष्ठ सभासद दतात्रय पांडूरंग पाटील,महादेव आबा आसवले,ज्ञानू गणपती पाटील,अमित पाटील, विजय कुलकर्णी,पांडूरंग हरी पाटील व इतर सर्व संचालक,सभासद हजर होते.