राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/SDGXDJFGK.jpg)
मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांपासून सिनेमागृह बंद आहेत. आता अनलॉकच्या प्रक्रियेत चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली असली तरीही सिनेमागृृहांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता ५ नोव्हेंबरपासून राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्सच सुरू होणार आहे. ५० टक्के क्षमतेसह सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच थिएटर, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्सना परवानगी देण्यात आली आहे.
तर, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.
सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.
थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणं बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणाऱ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उघडण्यास संमती देण्यात आली आहे. अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.