Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
अर्णब गोस्वामी अटक : महाविकास आघाडी विरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/wlucfvfhgrzgyhzy_1604468374.jpeg)
मुंबई । प्रतिनिधी
‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर राज्याचे विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे.
देशातील आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्ठात आली, पण मानसिकता आजही कायम आहे. आणिबाणीचे समर्थन करणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. तो लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/123473659_1922204367932486_4487958912224714552_n.jpg)