Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाऱ्या पतीला जन्मठेप

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा खुन करणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश आर व्ही़ आदोणे यांनी जन्मठेप व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़. 
प्रकाश ऊर्फ मुन्ना हनुमंत कुटके (वय ४६, रा़ चंदननगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे़. उमा प्रकाश कुटके (वय २५) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़. ही घटना चंदननगर २७ डिसेंबर २००८ रोजी घडली होती़. या प्रकरणी ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. 

याबाबतची माहिती अशी, प्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा़ २७ डिसेंबर २००८ रोजी प्रकाश दारु पिऊन घरी आला होता़. त्यावेळी त्याने तुला खल्लास करतो, असे म्हणून त्याने उमा यांच्यावर चाकूने वार करुन त्यांचा खुन केला़. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button