Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
Labor Minister Dilip Walse-Patil |कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही कोरोनाची बाधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/41_429.jpg)
पुणे । प्रतिनिधी
राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत वळसे-पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही वळसे-पाटील यांनी केले आहे.