कोरोना काळात समाजसेवा करणा-या पोलीस योध्यांचा सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/unnamed-5.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
कोरोना महामारीच्या काळात पोलिस प्रशासन हे आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत असतात. त्यामुळे अशा या कोरोना योध्यांचा सन्मान भाजप चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे आणि उन्नती सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कुंदा भिसे म्हणाल्या की, कोरोना काळात डाॅक्टर, सफाई कर्मचारी हे समाजासाठी कार्यरत होते. तसेच, कोरोना महामारीच्या काळात पोलिस प्रशासन हे सुद्धा जनतेच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र कार्यरत होत. कोरोना काळात पोलिस प्रशासनाची जनतेसाठी खुप मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
अतुल पाटिल, शैलेष बासुतकर, विकास काटे, शाम कुंजीर, महेश गवस, विवेक भिसे, ऋषिकेश होणे, अनिकेत फुरंगे, अँड. मुक्ता खानदेशी, सोनाली शिंपी व इतर महिला पोलिस अधीकारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, उपनिरीक्षक अजय भोसले यांनी कुंदा भिसे व संजय भिसे यांचे आभार व्यक्त केले.