महापालिकेच्या रोपवाटिकेतून चंदनाच्या पाच झाडांची चोरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/sandalwood-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील रोपवाटिकेमधून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरून नेली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महापालिकेचे उद्यान सुपरवायझर गणपत नारायण खुळे (रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 27 येथे महापालिकेची मध्यवर्ती रोपवाटिका आहे.
बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरटे या रोपवाटिकेत शिरले. येथील चार हजार रूपये किंमतीची पाच चंदनाची झाडे कशाच्या तरी सहाय्याने कापली. त्यानंतर त्याच्या फांद्या तेथेच टाकून गाभा चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 16) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यासह आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली जात आहे.