Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबई । प्रतिनिधी
देशाचे माजी राष्ट्रपती, थोर अणुशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांचा आज जन्मदिवस. डॉक्टर कलाम साहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
देशाला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दिवंगत डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री यांनी त्यांना आदरांजली वाहिली. दिवंगत कलाम साहेबांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्याही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार, आमदार शेखर निकम तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.