Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/congress-D.-K.-Shivakumar.jpeg)
काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयनं आज छापेमारी केली. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयनं धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.