प्रियंका चोपड़ाच्या ‘Unfinished’ या पुस्तकाचा नवा विक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/EjXnC3TUcAE7-oQ.jpg)
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:च्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोपड़ा हिने तिचा एक खास आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याला कारणही तसेच आहे. तिच्या ‘Unfinished’ या पुस्तकाने एक नवा विक्रम केला आहे आणि तो ही अमेरिकेत . प्रियंकाचे हे पुस्तक मागील 12 तासांत अमेरिकेत सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक बनले आहे. यामुळे हे अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट विक्री झालेले पुस्तक बनले आहे. प्रियंका या गोष्टीने फार आनंदून गेली असून तिने हा आनंद सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-14.jpg)
प्रियंकाने ट्विटरवर टॉप 10 पुस्तकांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत ‘मी सर्वांचे आभार मानते ज्यांनी माझे पुस्तक मागील 12 तासांत अमेरिकेत सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांच्या यादीत नेऊन ठेवले आहे. यामुळे ते नंबर 1 वर गेले आहे. आशा आहे तुम्हाला हे पुस्तक आवडेल.’
प्रियंकाच्या या भव्य यशाबद्दल तिच्या चाहत्यांना खबर लागताच देश विदेशातील तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रियंकाने दिलेल्या माहितीनुसार, तिने या पुस्तकाचे नाव खूप आधीच ठरवले होते. ती 20 वर्षांपासून एक सार्वजनिक व्यक्ती आहे. त्यामुळे तिने आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनला जीवनाविषयी या पुस्तकात लिहिले आहे.