breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात आणखी ३२७ पोलीस कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू
राज्यात २४ तासांमध्ये आणखी ३२७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. तर, एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २३ हजार ३६० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ९७५ जण, कोरोनामुक्त झालेले २० हजार १३९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २४६ जणांचा समावेश आहे. तसेच, राज्यात ७७ आरोग्य अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
राज्यातील एकूण २३ हजार ३६० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ५६३ अधिकारी व २० हजार ७९७ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ९७५ पोलिसांमध्ये ३६५ अधिकारी व २ हजार ६१० कर्मचारी आहेत.