Breaking-newsपिंपरी / चिंचवड
प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pcmc-7.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८ क्षेत्रीय समिती अध्यक्षांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बुधवारपासून (दि. ३०) तीन दिवस अर्जवाटप केले जाणार आहे. सोमवारी (दि. ५) अर्ज स्वीकारले जाणार असून शुक्रवारी (दि. ९) निवडणूक होणार आहे.
उमेदवारी अर्जाचे वाटप बुधवार (दि. ३०) व गुरुवारी (दि. १) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आणि सोमवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात केले जाणार आहे. उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. ५) दुपारी ३ ते सायंकाळी ५ असे केवळ २ तासांच्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत.