मी करोना पॉझिटिव्ह असल्याच्या त्या फक्त अफवाच – अलका कुबल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Alka-Kubal.jpg)
मुंबई | ‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या निर्मात्या आणि प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांनी नुकतंच एक व्हिडीओ जारी करत आपल्याला करोना झाला नसल्याचं स्पष्ट केल आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या सेटवर 22 जण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण झाली. मालिकेचं शूटीं साता-यात सुरु होतं. त्यामुळे त्यांना साता-यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
आज 26 सप्टेंबर रोजी अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशल मिडीयावर भावनाविविश होऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ब-याच गोष्टी उलगडल्या . ” अनेकांनी मला करोनाची लागण झाल्याच्या बातम्या पसरवल्या. तर काहींनी फेसबुकवर मला श्रध्दांजलीच वाहिली. त्या सर्वांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मला करोना झालेला नाही. आता आमच्या मालिकेची पूर्ण टीम करोनामुक्त झाली आहे.
आशालता ताई ह्या माझी आईच होत्या,त्यांना वाचविण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण त्या वयोवृध्द असल्याने उपचारांना नीट प्रतिसाद देऊ शकल्या नाहीत. आता त्यांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहेत. आम्ही आता जोमाने पुन्हा शुटींगला सुरुवात करतोय.”, असं अलका यांनी या व्हिडीओत स्पष्ट केलं आहे.