Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा : अंकिताचे आव्हान संपुष्टात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ankita-raina.jpg)
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीमधील दुसऱ्या फेरीचा टप्पा ओलांडण्यात भारताची अंकिता रैना अपयशी ठरली.
अंकिताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे मातीवरील कोर्टावर खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीमधील पुरुष आणि महिला दोन्ही एकेरी गटांमध्ये भारताचा एकही खेळाडू नसेल. जपानच्या कुरूमी नाराने गुरुवारी एक तास आणि २१ मिनिटे चाललेल्या सामन्यात अंकिताला ६-३, ६-२ असे नामोहरम करून तिचे आव्हान संपुष्टात आणले.