बॉलिवूड अभिनेत्री कंगनाच्या खारच्या घरावर पालिकेने नोटीस बजावली
![Actor Kangana Ranuat says rapist has to be hanged openly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Kangana-Ranaut-case-mumbai-1.jpg)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला आता मुंबई उच्च न्यायालयाकडून आणखी एक झटका मिळण्याची शक्यता आहे. पालिकेने खार येथील कंगनाच्या फ्लॅटला नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाने २०१३ साली मुंबईत खार येथे एका इमारतीतील पाचव्या मजल्यावर तीन फ्लॅट विकत घेतले. त्यानंतर २०१८ साली या फ्लॅटसाठी बेकायदा बदल व बांधकाम केल्याची तक्रार पालिकेत दाखल झाली. या प्रकरणी पालिकेने आता या घराबाबत कंगनाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका आता काय करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, रविवारी राज्यपालांची भेट झाल्यानंतर केवळ एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की, राज्यपाल आपले पालक आहेत. मी त्यांच्यासमोर माझी व्यथा मांडून मला न्याय मिळावा अशी विनंती केली. या शहराने मला मोठे केले आणि आज इथेच माझ्यावर अन्याय झाला. माझ्यासोबत अयोग्य वागणूक झाली. राजकारणाशी माझा संबंध नाही, मी कलाकार आहे. माझ्यासारख्यांचा प्रशासकीय व्यवस्थेवर विश्वास बसावा अशी मी इच्छा बोलून दाखवली, असे तिने सांगितले.