दिवसभरात 1363 जणांना कोरोनाची बाधा, तर 35 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-Corona-virus.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आज सायंकाळी चार वाजेपर्यंत केलेल्या तपासणी अहवालातून पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 1 हजार 363 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 35 जणांचा कोरोना विषाणुने मृत्यू झाला आहे. आजअखेर एकूण 62 हजार 594 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर, त्यातील एकूण 51 हजार 450 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी दररोज केली जात आहे. त्यातील अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत पालिकेच्या तपासणी पथकाने 9 हजार 933 घरांना भेट दिली. एकूण 32 हजार 143 नागरिकांची तपासणी केली. त्यातील 1 हजार 363 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
काल रात्रीपासून ते आज दिवसभरात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने 35 जणांना प्राण गमवावे लागले. तर, 62 हजार 594 बाधितांपैकी 51 हजार 450 जणांनी या विषाणुला यशस्वीपणे हरविले आहे. आजपर्यंत शहरातील 1 हजार 26 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.