देशात २४ तासांत तब्बल ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
मुंबई – कोरोनाबाधितांचा आकडा देशात दिवसेंदिवस वाढत असून देशासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने देशातील समस्या वाढली आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ असून गेल्या काही दिवसांपासून हा आकडा वाढत असल्याने येत्या काळात दिवसाला १ लाख नवे रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. तर, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ४६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या २४ तासांत १ हजार २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.