शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील ‘वस्त्रहरण’, वादग्रस्त पोस्टर झळकले
मुंबई – कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यावेळी अनेकांनी कंगनाला पाठिंबा दर्शविला असला तरी अनेक शिवसैनिकांकडून कंगनाचा आणि तिच्या ट्विटचा निषेध केला जात आहे.
बिहार आणि हिमाचल प्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशातूनही शिवसेनेवर टीका केली जात आहे. वाराणसीत तर एक पोस्टर झळकलं आहे. टिपण्णी सुरु झाली आहे. कंगना आणि शिवसेना वादावर वाराणसीत एक वादग्रस्त पोस्टर झळकलं आहे.
महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाची तुलना कंगना-शिवसेना वादाशी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुश्यासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये संजय राऊतही बसलेले दिसत आहेत.
वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर लावले आहे. याबद्दल त्यांनी सांगितले की, कंगना आणि शिवसेना वादात महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कौरव सेनेप्रमाणे वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महिलांच्या संरक्षणासाठी पुढे आले व त्यांनी कंगनाला संरक्षण दिलं. या वादावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही चकार शब्द काढला नाही, त्यामुळे मिश्रा यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे.