भोसरीत देशी बनावटीचे पिस्तुल अन् जीवंत काडतुसाह आरोपी गजाआड
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई : खंडणी/ दरोडा विरोधी पथकाचे सहकार्य
पिंपरी । प्रतिनिधी
विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल आणि जीवंत काडतूस बाळगणाऱ्या आरोपीस खंडणी व दरोडा विरोधी पथक आणि पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली.
आकाश दत्तात्रय कोठावडे (वय-२४, रा. सर्वे. नं. ५३/८, निर्मन टाउनशीपशेजारी रामराव काळे यांची चाळ, काळेपडळ, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे.) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी व दरोडा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधरी अस्पत यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस हवालदार महेश खाडे, पोलीस नाईक नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, पोलीस शिपाई आशिष बनकर, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत ‘टॉप २५’ मोस्ट वॉन्टेड, आरोपींबाबत माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
दरम्यान, पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस नाईक प्रविण कांबळै व पोलीस शिपाई आशिष बनकर यांना भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहासमोर एक व्यक्ती त्याच्या मित्राला भेटण्यासाठी येणार असून, त्याच्या अंगात फिकट निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परीधान केली आहे. त्याजवळ पिस्तुल सारखे शस्त्र आहे, अशी खात्रीशीर माहिती त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे रात्री सुमारे १० वाजता आरोपी आकाश कोठावडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नाही. त्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), मुं. पो. ॲक्ट ३७(१) (३) सह १३५ या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाइ्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/ दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीस अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी महेश खांडे, अशोक दुधवणे, प्रविण कांबळे, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, आशिष बनकर, गणेश कोकणे, सागर शेडगे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे, अशी माहिती खंडणी/ दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिली आहे.