Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
माजी महापौर दत्ता एकबोटे यांना काँग्रेसतर्फे श्रद्धांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Pune-Former-Mayor-Datta-Ekbote-Corona-Death.jpg)
पुणे – पुणे महापालिकेचे माजी महापौर आणि समाजवादी विचारांचे नेते दत्ता एकबोटे यांना पुणे महापालिका काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महापौर आणि नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत दत्ता एकबोटे यांनी पुणे शहराच्या विकासात भरीव योगदान दिले. हातगाडी व पथारीवाले यांच्यासाठी हॉकर्स झोन, गरिबांसाठी मोफत अंत्यविधी योजना, बिबवेवाडी पुनर्वसन प्रकल्प अशा योजनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला.त्यांनी विडी कामगारांसाठी घरकुल योजना यशस्वीपणे राबविली. कष्टकरी, शोषित वर्गाच्या हक्कासाठी सदैव लढा दिला. त्यांचे कार्य स्मरणात राहील, असे काँग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले.