Breaking-newsपश्चिम महाराष्ट्र
सांगलीत आज 716 जणांना कोरोनाची लागण
सांगली – सांगलीत कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. जिल्ह्यात आज 716 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर दिवसभरात 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14 हजार 613 इतकी झाली आहे. जिल्ह्यात सध्या 5 हजार 957 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 566 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 8 हजार 90 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. सांगलीत रोजच कोरोनाचे शेकडोंनी रुग्ण आढळत आहे त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडत आहे.