स्व.शिवाजीराव देशमुख यांच्या 85 व्या जयंती निम्मित सागावं येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
स्व.शिवाजीराव देशमुख यांच्या 85 व्या जयंती निम्मित सागावं येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होत. त्याचबरोबर देशमुख यांच्या डोंगरी विकास कार्यक्रम आमदार फंडातून साकारण्यात आलेल्या अंगणवाडीचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. त्यावेळी भाजपाचे नेते सत्यजित देशमुख ,जि.प.सदस्य संपतराव देशमुख ,माजी सभापती हणमंत पाटील बापु यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी सभापती चंद्रकांत पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी,शामराव पाटील,किरण पाटील,शिवाजी माने,मानसिंग पाटील,सुहास पवार,अजित कांबळे,आनंदा मालगुंडे, संग्राम पवार, सतीश सुतार,प्रदीप शेटे,सागर गायकवाड, सचिन पाटील,प्रशांत पवार, महेश पाटील, गणेश रसाळ, मोहन जाधव, गोरख पवार, प्रकाश पाटील, जगदीश कदम व सर्व प्रतिष्टीत मान्यवर,आजी माजी पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.