31 ऑगस्ट नंतर काय ? पहा मुख्यमंत्री काय म्हणाले…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/1600x960_921788-uddhav-thackeray-lockdown-maharashtra.jpg)
राज्यात गेल्या ३-४ महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. काही अंशी नियमांमध्ये सरकारने शिथिलता दिली असली तरी ३१ ऑगस्ट नंतर काय हा प्रश्न आहेच. दरम्यान, जूनपासून देशात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. देशातील काही राज्यांनी निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत सुरू केले असले तरी महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे १ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
काल ठाण्यात सध्या काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याला गेले होते. काही राज्यांनी गोष्टी घाईगडबडीने सुुरू केल्या. मात्र महाराष्ट्र अशी घाईगर्दी करणार नाही.असही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सुरू केल्या आहेत. पण, ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल, याची खात्री नाही त्या सुरू केल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.ठाणेकरांनी सर्व नियम पाळून गणपती उत्सव साजरा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाआधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा की, उत्सव कसा साजरा होणार, विसर्जन कसे होणार, परंतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा आणि मुंब्य्रात ११०० बेडच्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.