राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona-virus-2-3-1.jpg)
- मुंबईत ९३१, पुण्यात २,५४३ नवे रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात राज्यात ११ हजार ११९ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ४२२ मृत्यूंची नोंद झाली. तसेच ९ हजार ३५६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह राज्यात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण २० हजार ६८७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर १ लाख ५६ हजार ६०८ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ३० हजार ४१० वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ५ हजार १९३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
तसेच पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात २ हजार ५४३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यात पुणे शहरातील १ हजार २२४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात ९६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतच्या दिवसभरातल्या कोरोनाबळींच्या आकड्याचा हा उच्चांक ठरला आहे. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २९ हजार ५६९ वर पोहोचला आहे. यापैकी ३ हजार २०० जणांनी आपला जीव गमावला आहे.