जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातील महत्वाच्या पदांवर अधिका-यांच्या नियुक्त्या, राज्य शासनाचा आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/dc-Cover-9q11pg7ojf1eknupa9adpohha3-20180506174643.Medi_.jpeg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यातील महत्वाच्या पदांवर अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश राज्य सरकारने आज काढला आहे. त्यामध्ये डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारमधील एकूण सहा अधिका-यांच्या एकाच दिवशी अन्य ठिकाणी नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी एस. ए. तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे. पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे. सुनील चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पुणे या रिक्त पदावर केली आहे. डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक हाफकिन औषध निर्माण महामंडळ मुंबई या पदावर करण्यात आली आहे. आणि संदीप कदम यांची नियुक्ती जिल्हाधिकारी भंडारी या पदावर करण्यात आली आहे. एकूण सहा अधिका-यांच्या नियुक्तीसंदर्भात राज्य सरकारने आज आदेश काढला आहे.